उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून अनिल अत्रे यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:28+5:302021-09-07T04:22:28+5:30
वाचनालयाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्याहस्ते दिप प्रज्वलन होऊन, सभेला सुरूवात झाली. वाचनालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. मनिष जोशी यांनी ...

उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून अनिल अत्रे यांचा गौरव
वाचनालयाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्याहस्ते दिप प्रज्वलन होऊन, सभेला सुरूवात झाली. वाचनालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. मनिष जोशी यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. यानंतर वाचनालयाचे कार्याध्यक्ष ॲड. प्रताप निकम यांनी प्रास्ताविकात गेल्या वर्षांचा कामकाजाचा आढावा सांगून सभेला सुरूवात झाली. या सभेत ॲड. गुरूदत्त व्यवहारे यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन करून, अनिल कुमार शाह यांनी वार्षिक अहवाल ताळेबंद जमाखर्च सादर केला. या सभेला प्रा. चारूदत्त गोखले, प्रा. शरदचंद्र छापेकर, संगिता अट्रावलकर, शिल्पा बेंडाळे, विजय पाठक, ॲड. दत्तात्रय भोकरीकर, शांताराम सोनार, नितीन देशमुख, महेश भामरे, अभय सहजे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन शुभदा कुलकर्णी यांनी तर आभार अभिजीत देशपांडे यांनी मानले.
इन्फो :
उत्कृष्ठ वाचकांचा गौरव
या सभेत वाचनालयातर्फे उत्कृष्ठ वाचक म्हणून नीलेश कुलकर्णी, चंद्रकांत वाणी, अरूण पाटील, हेमंत चौधरी, संगिता संघवी यांचा सत्कार करण्यात आला.