विरोदा येथील संतप्त महिलांची तहसील कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 18:36 IST2017-09-11T18:35:20+5:302017-09-11T18:36:49+5:30
पात्र लाभाथ्र्याना रेशनचे धान्य मिळत नसल्याची तक्रार

विरोदा येथील संतप्त महिलांची तहसील कार्यालयावर धडक
ऑनलाईन लोकमत
यावल,दि.11 - विरोदा येथील रेशन कार्डधारकांना रेशनवरील धान्य मिळत नसल्याने सुमारे 30 ते 40 महिलांनी यावल येथील तहसीलदार कार्यालयावर सोमवारी दुपारी 12 वाजता मोर्चा आणून निवेदन दिले. नायब तहसीलदार योगिता ढोले यांनी संतप्त महिलांचे निवेदन स्वीकारले.
तालुक्यातील विरोदा येथील सुमारे 30 -40 महिलांनी तहसीलदार कार्यालयात येवून रेशन दुकानदारांकडून धान्य मिळत नसल्याची तक्रार केली आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या रहिवाशांना मात्र रेशनवरुन धान्य मिळते, मात्र ख:या लाभाथ्र्याना यातून डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. विरोदा येथील सरपंच र}माला चौधरी यांनी नायब तहसीलदार यांच्यासमोर महिलांची बाजू मांडली. यावेळी योगिनी वारके, सिमा वारके, भारती वारके, भारती खाचणे, उर्मिला चौधरी, वंदना मोरे, रंजना गणेरकर यांच्यासह सुमारे 40 महिला उपस्थित होत्या.