संतप्त महिलांनी खरजई ग्रा. पं. ला लावले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 19:31 IST2020-08-28T19:31:15+5:302020-08-28T19:31:28+5:30
कार्यालयासमोर धरला ठिय्या : हगणदरीमुक्त गावात महिला शौचालयाचा प्रश्न सुटेना

संतप्त महिलांनी खरजई ग्रा. पं. ला लावले टाळे
चाळीसगाव: तालुक्यातील खरजई येथील गाव हागणदरीमुक्त असूनही महिला शौचालयाचा प्रश्न आजपर्यंत मार्गी का लागत नाही ? याची विचारणा करत संतप्त महिलांनी शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायतील कुलूप ठोकत त्यावर शेण लावून निषेध केला. त्यानंतर बराच वेळ ठिय्या आंदोलन केले.
सदर ठिय्या आंदोलनात अर्चना पवार, कल्पना वाघ, सुरेखा कडवे, शालूबाई नाबदे , रमणबाई तोडकर , बापू काळे यांचेसह अनेक महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते. दरम्यान शनिवारी तहसील कचेरीवर मोर्च नेण्याचा इशारा दिला आहे.