प्रकल्पग्रस्तांच्या असुविधांबाबत प्राधिकरण सदस्याची नाराजी
By Admin | Updated: December 23, 2015 00:48 IST2015-12-23T00:48:18+5:302015-12-23T00:48:18+5:30
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या महाराष्ट्रातील वसाहतींमध्ये अद्यापही अपेक्षित सुविधा देण्यात न आल्याने प्राधिकरणाचे अफरोज अहमद यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रकल्पग्रस्तांच्या असुविधांबाबत प्राधिकरण सदस्याची नाराजी
नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या महाराष्ट्रातील वसाहतींमध्ये अद्यापही अपेक्षित सुविधा देण्यात न आल्याने नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे सदस्य अफरोज अहमद यांनी मंगळवारी येथे नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. अफरोज अहमद यांनी काथर्देदिगर व त:हावद या पुनर्वसन वसाहतींना भेट दिली. 10 वर्षापासून सिंचनाची सुविधा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत सिंचनाचा प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आदेश अधिका:यांना दिले. ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन देणे बाकी आहे त्यांना देऊ. त्यासाठी 500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन लागेल, असे अहमद यांनी मान्य केले. या वेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकत्र्या अॅड. योगिनी खानोलकर, लतिका राजपूत यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांचा सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मध्यम किंवा छोटे-छोटे प्रकल्प उभारता येतील काय, याबाबत आपण विचार करीत आहोत. आपण आतार्पयत प्रकल्पग्रस्तांच्या मूळ गावात येऊ शकलो नाही. परंतु पुढील महिन्यात पुन्हा येऊ. तेव्हा मूळ गावांना भेटी देऊ -अफरोज अहमद