बाजूला हो बोलल्याचा राग येऊन एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST2021-07-10T04:12:52+5:302021-07-10T04:12:52+5:30
जळगाव : रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या तरुणाला बाजूला हो बोलल्याचा राग येऊन त्याने प्रमोद ऊर्फ कालू भागवत पाटील ...

बाजूला हो बोलल्याचा राग येऊन एकाला मारहाण
जळगाव : रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या तरुणाला बाजूला हो बोलल्याचा राग येऊन त्याने प्रमोद ऊर्फ कालू भागवत पाटील (३४, रा.आव्हाणे) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना आव्हाणेे येथे ४ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद पाटील हे आव्हाण्यातील धनगरवाडा येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ४ जुलैच्या सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ते दुचाकीने आव्हाण्यातील मुख्य चौकाच्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी आकाश ज्ञानेश्वर शिंदे हा तरुण रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. त्याला पाटील यांनी रस्त्याच्या बाजूला हो असे सांगितले. याचा राग येऊन आकाशने त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी गुरुवारी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.