जिल्हा परिषदेत स्वकीयांचा संताप

By Admin | Updated: July 31, 2014 14:54 IST2014-07-31T14:54:33+5:302014-07-31T14:54:33+5:30

जिल्हा परिषदेत बुधवारी स्वकीयांनीच जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपेंकडे येऊन कामांच्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांची या प्रकारामुळे कोंडी झाल्याची स्थिती झाली.

The anger of the people in the Zilla Parishad | जिल्हा परिषदेत स्वकीयांचा संताप

जिल्हा परिषदेत स्वकीयांचा संताप

>जळगाव : जिल्हा परिषदेत बुधवारी स्वकीयांनीच जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपेंकडे येऊन कामांच्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांची या प्रकारामुळे कोंडी झाल्याची स्थिती झाली, अर्थात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू व्हायला फारसे दिवस उरलेले नाहीत. अशात सदस्यांच्या गटांमधील कामांचे व इतर प्रस्ताव रेंगाळले आहेत. यामुळे सदस्य संतप्त झाले आहेत. 
पहिला संताप मालचेंचा
खोडपे व त्यांचे काही निकटवर्तीय दालनात असताना सोनवद गटातील भाजपाच्या जि.प.सदस्या शोभाबाई मालचे यांचे पती बापूराव मालचे आले. त्यांनी आपल्या भागात कामे देताना विश्‍वासात घेतले जात नाही. असेच सुरू राहिले तर शोभाबाई या जि.प.सदस्य पदाचा राजीनामा देतील, असेही त्यांनी या दालनात जाहीरपणे सांगितले. खोडपे यांनी त्यांची बराच वेळ समजूत काढली, पण ते नाराज चेहरा घेऊनच या दालनातून निघून गेले. 
दुसरा संताप पाटलांचा
जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदाच्या स्पर्धेतून मागे पडलेल्या पूनम पाटील यांचे पती दुर्गादास पाटील यांनीदेखील एका कामाच्या संदर्भामध्ये 'काम करायचे असेल तर लवकर करा', असे सांगत खोडपेंकडे त्यांच्या दालनात नाराजी व्यक्त केली. पाटील हे नाराज होत असल्याचे लक्षात घेता खोडपे पाटील यांना लागलीच अँण्टी चेंबरमध्ये चर्चेसाठी घेऊन गेले. चर्चेनंतर पाटील यांनी नाराजी सोडल्याची माहिती मिळाली.
---------------
आचारसंहितेची भीती असतानाच विरोधी गटातील मंडळी मात्र जि.प.तून व्यवस्थितपणे कामे मिळवित आहे. बापूराव मालचे हे काही कामांच्या संदर्भामध्ये भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी ग्रा.पं.ना काम दिले जात असल्याचे सांगितले. त्यांची जि.प.तील पदाधिकार्‍यांबाबत नाराजी नव्हती. त्यांचे त्यांच्या भागातील ग्रा.पं.ना मिळालेल्या कामांच्या संदर्भामध्ये काही अंतर्गत प्रश्न असतील. -दिलीप खोडपे, जि.प.अध्यक्ष 

Web Title: The anger of the people in the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.