जाब विचारल्याचा राग, पती-पत्नीस चौघांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:55+5:302021-07-03T04:11:55+5:30

जळगाव : कुत्रे मोकाट असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कैलास प्रेमचंद चौधरी (४६) व त्यांच्या पत्नीला लोखंडी सळईने बेदम मारहाण ...

Anger at Jab's request, husband and wife beaten by four | जाब विचारल्याचा राग, पती-पत्नीस चौघांकडून मारहाण

जाब विचारल्याचा राग, पती-पत्नीस चौघांकडून मारहाण

जळगाव : कुत्रे मोकाट असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कैलास प्रेमचंद चौधरी (४६) व त्यांच्या पत्नीला लोखंडी सळईने बेदम मारहाण करीत जीवे ठार करण्याची धमकी दिल्याची घटना २६ जून रोजी रुक्मिणी नगरात घडली. याप्रकरणी गुरुवारी रामानंदनगर पोलिसात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वाघ नगरातील रुक्मिणी नगरात कैलास प्रेमचंद चौधरी हे पत्नीसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, २६ जून रोजी शेजाऱ्यांची कुत्रे मोकाट असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी कैलास चौधरी हे त्यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांना सुभाष साळुंखे यांनी लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच त्यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी गेली असता त्यांनादेखील करण सुभाष साळुंखे, चेतन सुभाष साळुंखे व उषा सुभाष साळुंखे या तिघांनी चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जीवे ठार मारल्याची धमकी दिली. याप्रकरणी गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहेत.

Web Title: Anger at Jab's request, husband and wife beaten by four