भुसावळ : वेतन विभाग (प्राथमिक) कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याची तक्रार खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने केली आहे. शासनाकडून अनुदान उपलब्ध असूनही शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाही. विचारणा केल्यास प्राथमिक वेतन कार्यालयाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने शिक्षण सभापती रवींद्र पाटील, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, वेतन अधीक्षक राजश्री संदानशिवे यांना १७ रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे, तालुका सचिव जीवन महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत धांडे, शिक्षकेतर कर्मचारी समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष मराठे, देव सरकटे, मिलिंद कोल्हे, विजय झोपे, दीपक तेली, अमित चौधरी, दीपक टोके, तेजेंद्र महाजन, साबीर अहमद, हितेश सरोदे, योगेश बोरसे, विकास शेळके आदी उपस्थित होते.
संयुक्त बैठक घेऊन समस्या सोडविल्या जातील - अकलाडे
वेतन विभाग प्राथमिक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन शिक्षकांच्या वेतनासंदर्भातील, डीसीपीएस हिशेब व मेडिकल बिलांसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यात येतील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिले.
लवकरच शिक्षकांच्या समस्या मार्गी लावू- रवींद्र पाटील
शिक्षक संघटना व शिक्षण विभागातील अधिकारी यांची बैठक घेऊन शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावू, असे शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : वेतन विभाग (प्राथमिक) कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याची तक्रार खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने केली आहे.
शासनाकडून अनुदान उपलब्ध असूनही शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाही. विचारणा केल्यास प्राथमिक वेतन कार्यालयाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने शिक्षण सभापती रवींद्र पाटील, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, वेतन अधीक्षक राजश्री संदानशिवे यांना १७ रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे तालुका अध्यक्ष गणेश लोखंडे, तालुका सचिव जीवन महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत धांडे, शिक्षकेतर कर्मचारी समितीचे जिल्हा अध्यक्ष संतोष मराठे, देव सरकटे, मिलिंद कोल्हे, विजय झोपे, दीपक तेली, अमित चौधरी, दीपक टोके, तेजेंद्र महाजन, साबिर अहमद, हितेश सरोदे, योगेश बोरसे, विकास शेळके आदी उपस्थित होते.
संयुक्त बैठक घेऊन समस्या सोडविल्या जातील- अकलाडे
वेतन विभाग प्राथमिक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन शिक्षकांच्या वेतनसंदर्भातील, डीसीपीएस हिशोब व मेडिकल बिलासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यात येतील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिले.
लवकरच शिक्षकांच्या समस्या मार्गी लावू- रवींद्र पाटील
शिक्षक संघटना व शिक्षण विभागातील अधिकारी यांची बैठक घेऊन शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावू, असे शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी सांगितले.