आणि झाला अपेक्षाभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:27+5:302021-07-27T04:17:27+5:30
मेळावा खरे तर गिरीश महाजन यांना घेरण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र उपस्थित नेत्यांनी राजकारणावर न बोलता थेट युवकांच्या ...

आणि झाला अपेक्षाभंग
मेळावा खरे तर गिरीश महाजन यांना घेरण्यासाठी आयोजित करण्यात आला
होता. मात्र उपस्थित नेत्यांनी राजकारणावर न बोलता थेट युवकांच्या बेरोजगारीवर भाषणे करून युवकांना दिलासा दिला. कोरोनामुळे बेरोजगारी वाढली आहे, यात शंका नाही. पण त्यातल्या त्यात युवकांना दिलासा देण्याचे काम या मेळाव्याने केले आहे. अनेकांना यानिमित्ताने जॉब मिळाला. त्यामुळे राजकारणी लोकांच्या माध्यमातून का होईना अनेक कुटुंबे यामुळे उभी राहणार आहेत. उपस्थित नेत्यांनी तर आपण राजकारणावर काहीच बोलणार नाही, असे सांगून अपेक्षा लावून बसलेल्यांचा अपेक्षाभंग केला. काही मंडळींनी तर महाजन यांच्यावर आरोप झाल्यास त्यावर त्याला सायंकाळी उत्तर देण्याची तयारी सुरू केली होती. पण काही तरी वंगाळ घडेल असे वाट पाहणाऱ्यांना मात्र यानिमित्ताने चांगलेही घडून आल्याचे पाहून नक्कीच मनातून वाईट वाटले असेल.
चुडामण बोरसे