व. वा. वाचनालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:33+5:302021-08-20T04:21:33+5:30
व. वा. जिल्हा वाचनालयातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष ॲड. प्रताप निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात ...

व. वा. वाचनालय
व. वा. जिल्हा वाचनालयातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष ॲड. प्रताप निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत वाचनालयातील स्वातंत्र्य संग्रामविषयक थोर नेत्यांच्या जीवनावरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ॲड. सुशील अत्रे, ॲड. गुरूदत्त व्यवहारे, ॲड. दत्तात्रय भोकरीकर, अभिजित देशपांडे, ॲड. महेश जाधव, ॲड. बाळासाहेब महाजन, अनिल अत्रे, अनिल भावसार, संजय शिंदीकर, मोहिनीराज जोशी, गिरीश तारे, ज्ञानदेव वाणी, गुलाब मोरे आदींची उपस्थिती होती.
अँग्लो उर्दू हायस्कूल
अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रवींद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बाबू शेख यांनी केले. त्यात त्यांनी शहिदांविषयी माहिती दिली. त्यानंतर रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सैय्यद चांद सैय्यद अमीर, पर्यवेक्षक हनिफ आदींची उपस्थिती होती. आभार एस. एम. फारूख यांनी मानले व सूत्रसंचालन शेख हुमायू यांनी केले.
गिरिजाबाई नथ्थुशेठ प्राथमिक विद्यामंदिर
साने गुरुजी कॉलनी येथील गिरिजाबाई नथ्थुशेठ प्राथमिक विद्यामंदिर येथे भगीरथ शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. याप्रसंगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी देशभक्तीवर गीते सादर केली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी ऑनलाइन वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी एस. डी. भिरूड उपस्थित हाेते.
इकरा पब्लिक स्कूल
मोहाडी शिवारातील इकरा पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इकरा पब्लिक स्कूल, डी. एड. कॉलेजचे प्राचार्य व मुख्याध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर देशाला स्वतंत्र मिळवून दिलेल्या स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करण्यात आले.
कमल राजाराम वाणी विद्यालय
कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यालय येथे संस्थेच्या संचालिका ललिता वाणी, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी व नीलेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. वाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षकांनी ध्वजप्रतिज्ञा घेतली. नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा, चित्रकला, रांगाेळी, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. त्यात भाविका हिवराळे, यशश्री बोरसे, पार्थ बोरसे, दिव्यांका भास्कर, धनश्री भारुडे, फैजान तडवी, तेजल पवार, वैष्णवी सुतार, आरुषी बडगुजर, उपलक्ष पाटील, नंदिनी सोनार, सानिया तडवी आदींनी बक्षिसे मिळविली. उज्ज्वला जाधव यांनी परीक्षण केले. सूत्रसंचालन नरेंद्र वारके यांनी केले तर वंदना नेहते, रशिदा तडवी, राहुल धनगर, श्रीकांत पाटील, राजेंद्र पवार, संगीता निकम, सुवर्णा सोनार, ज्योती सपकाळे, छाया पाटील, स्वाती याज्ञिक, भूषण बऱ्हाटे आदींनी परिश्रम घेतले.