..तर सीबीआय चौकशीची मागणी करणार

By Admin | Updated: December 4, 2015 01:07 IST2015-12-04T01:07:08+5:302015-12-04T01:07:08+5:30

जळगाव : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास सीआयडीकडे आहे.

..and demanded a CBI inquiry | ..तर सीबीआय चौकशीची मागणी करणार

..तर सीबीआय चौकशीची मागणी करणार

जळगाव : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास सीआयडीकडे आहे. सध्या तरी तपास योग्य पध्दतीने होत आहे, मात्र त्यात शंका वाटल्यास सीबीआय चौकशीची मागणी करु, असे स्पष्टीकरण देताना या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी अशोक सादरे यांच्या प

कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी जळगावात

माधुरी सादरे या पती अशोक सादरेंच्या मृत्यूनंतर पेन्शनच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी गुरुवारी शहरात आल्या होत्या. त्यांच्या सोबत सादरेंचे मावस बंधू अॅड.संजय लवांदे, माधुरी सादरे यांचे काका अशोक कहाने व बहीण योगिता भालसिंग आदी होते. दुपारी 12 वाजता आल्यानंतर त्यांनी न्यायालयात जाऊन तत्कालीन पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांच्यावर अशोक सादरे यांनी दाखल केलेल्या दोन कोटींच्या बदनामीच्या खटल्यासंदर्भात कागदपत्रे तयार केली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांची भेट घेऊन सुमारे वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. कार्यालय अधीक्षक तडवी यांच्याकडे पेन्श्नाच्या कागदपत्रांची पूर्तता करून काही अर्जावर स्वाक्ष:या केल्या.

खटला वर्ग करण्याची विनंती

पती सादरे यांनी जयकुमार यांच्याविरुध्द जळगाव न्यायालयात दाखल केलेला बदनामीचा खटला नाशिक किंवा नगर येथे वर्ग करण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली आहे. याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तताही न्यायालयात केली, अशी माहिती मिळाली.

सादरे यांची वैयक्तिक डायरी अद्याप सापडलेली नाही. तपासी यंत्रणेने त्या डायरीचा शोध घ्यावा. पतीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसेच तपासात निष्पन्न होणा:या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

}ी माधुरी सादरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Web Title: ..and demanded a CBI inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.