राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांचा अमृत महोत्सव सोहळा

By Admin | Updated: May 28, 2017 17:34 IST2017-05-28T17:34:51+5:302017-05-28T17:34:51+5:30

मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

Amrut Mahotsav ceremony of NCP senior leader Arunbhai Gujarathi | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांचा अमृत महोत्सव सोहळा

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांचा अमृत महोत्सव सोहळा

ऑनलाईन लोकमत

चोपडा,दि.28- विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरूणभाई गुजराथी यांचा  व चोपडा पीपल्स बॅँकेच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री सोमवारी 29 रोजी चोपडय़ात येत आहेत. 
हा सोहळा प्रताप विद्या मंदिराच्या प्रांगणावर सकाळी 9  वाजता होणार आहे. सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे ,केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत  पाटील, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जयंत पाटील, अमरिशभाई पटेल, खासदार रक्षा खडसे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचेसह अनेकजण उपस्थित राहणार आहेत. 
 

Web Title: Amrut Mahotsav ceremony of NCP senior leader Arunbhai Gujarathi