खासगी रुग्णालयात पुरेशा सुविधा असल्यानंतरच मिळणार ॲम्फोटेरिसिन बी इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:29+5:302021-05-26T04:17:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळणाऱ्या आणि बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात पुरेशा सुविधा आणि तज्ज्ञ ...

Amphotericin B injection will be available only after adequate facilities in a private hospital | खासगी रुग्णालयात पुरेशा सुविधा असल्यानंतरच मिळणार ॲम्फोटेरिसिन बी इंजेक्शन

खासगी रुग्णालयात पुरेशा सुविधा असल्यानंतरच मिळणार ॲम्फोटेरिसिन बी इंजेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळणाऱ्या आणि बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात पुरेशा सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर असेल तर खासगी रुग्णालयांना ॲम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन वितरित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत. त्याचे परिपत्रकदेखील प्रसिद्ध करण्यात आले.

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळणाऱ्या आणि बाधित झालेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात डॉक्टर तात्पुरते उपचार करत असल्याचे निर्दशनात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राऊत यांनी या सूचना दिल्यात.

ज्या रुग्णालयांमध्ये कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर,नेत्ररोग तज्ज्ञ आणि सर्जन यांची सुविधा उपलब्ध असेल अशा रुग्णालयांनी माहिती जिल्हा प्रशासनाला व जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविणे आवश्यक राहील. या बाबींची पूर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच उपचाराकरिता जिल्हा शल्य चिकित्सक ॲम्फोटेरिसिन बी इंजेक्शन वितरित करतील. या सूचनांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Web Title: Amphotericin B injection will be available only after adequate facilities in a private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.