शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमित पाटील यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 19:20 IST

वीर जवान अमित साहेबराव पाटील यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे वाकडी येथे पोहचत असून सकाळी ९.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देवाकडीत तयारी पूर्ण : लष्करीसह शासकीय इतमामात निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : वीर जवान अमित साहेबराव पाटील यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे वाकडी येथे पोहचत असून सकाळी ९.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान गुरुवारी वाकडी येथे अमित पाटील यांच्याच रोकडे रस्त्यालगतच्या शेतात.अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली आहे. 

अमित पाटील हे पुंछ सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलातील सैनिक म्हणून तैनात होते. २७ नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हिमनगाचा भाग कोसळल्याने त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. यानंतर त्यांना पुंछ येथील सैनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथे चार दिवस उपचार केल्यानंतर जम्मुच्या सैनिक रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले. १९ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेरीस १५ रोजी त्यांची मृत्यूसोबत सुरु असलेली लढाई थांबली. मृत्यूने अमित पाटील यांच्यावर मात केली. पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्युची बातमी कुटूंबियांना कळविल्यानंतर संपूर्ण वाकडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

लष्करी इतमामात आज अखेरचा प्रणाम

वीर जवान अमित पाटील यांचे पार्थिव गुरुवारी दिल्लीहून इंदोर येथे आणण्यात आले. तेथून रात्रीचा प्रवास करीत शुक्रवारी वाकडी येथे पोहचणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी शासनाच्यावतीनेही मानवंदना दिली जाणार असल्याची माहिती तहसिलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

ReplyForward

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावSoldierसैनिकDeathमृत्यू