शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जळगावात गर्भवती, प्रसूत महिलांसाठी रुग्णवाहिकांना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:35 IST

१०२ क्रमांकाची सेवा कागदावरच

ठळक मुद्देगरजू रुग्ण लाभापासून वंचितग्रामीण भागात प्रचंड गैरसोय

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात हलविणे तसेच प्रसूत महिलांना घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळावी म्हणून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ‘१०२’ या क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही उत्तर मिळत नाही. त्यामुळे गरजू रुग्णांना याचा लाभ मिळत नसून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करण्यासह प्रचंड त्रासही सहन करावा लागत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग आॅपरेशद्वारे उघड झाले आहे.ग्रामीण भागात आजही घरी प्रसूती करण्याचे प्रमाण अधिक असल्याने ते बऱ्याचवेळा महिला अथवा नवजात बाळाच्या जिवावर बेतते. घरी होणाºया या प्रसूतीचे प्रमाण टाळले जावे तसेच बाल व माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने रुग्णालयांमध्येच प्रसूती व्हावी, यासाठी कोठूनही संपर्क साधून रुग्णवाहिका मिळावी म्हणून १०२ या स्वतंत्र क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मुंबई येथून त्या-त्या भागातील कॉल सेंटरला याची माहिती देऊन रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचविली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून १०२ ही सुविधा बंद असल्याचा रुग्णांना अनुभव येत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.जिल्हा रुग्णालयात ताटकळली होती महिलायावल तालुक्यातील किनगाव येथील एका २७ वर्षीय महिलेला प्रसूतीसाठी गेल्या महिन्यात जिल्हा रुग्णालायात दाखल केले होते. प्रसूतीनंतर १३ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातून या महिलेला घरी नेण्यासाठी १०२ क्रमांकावर वारंवार संपर्क साधला. मात्र वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर खाजगी रुग्णवाहिका करून संध्याकाळी सहा वाजता या महिलेला घरी नेण्यात आले होते. यामुळे तब्बल सात ही महिला व नवजात बालक जिल्हा रुग्णालयात ताटकळले होते. त्यानंतरही वारंवार गर्भवती व प्रसूत महिलांच्या नातेवाईकांना असे अनुभव येऊ लागल्याने या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने रविवार, ६ मे रोजी या संदर्भात दिवसभरवारंवार या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र कधी फोन लागलाच नाही तर कधी रिंग वाजत असली असती तिकडून प्रतिसाद मिळत नव्हता.दररोज २० ते २५ प्रसूतीजळगाव जिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी २० ते २५ प्रसूती होतात. या महिलांना येथे येण्यासाठी संपर्क न झाल्याने त्यांना या सेवेचा फायदा मिळू शकत नाही. त्यामुळे आरोग्य विभाग, राज्य शासनाने या बाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.१०२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आलेले अनुभवदुपारी १.१५ वाजतादुपारी १.१५ वाजता १०२ क्रमांकावर संपर्क साधला असता दूरध्वनी व्यस्त असल्याचा टोन ऐकू येत होता. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन वेळा या क्रमांकावर संपर्क साधला असता असाच अनुभव आला.दुपारी २.१० वाजतादुपारी १.१५ वाजता संपर्क होऊ शकला नाही म्हणून दुपारी २.१० वाजता पुन्हा हा क्रमांक लावला असता त्या वेळी हा क्रमांक व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा.. असा संदेश ऐकू येत होता.दुपारी ४ वाजतापुन्हा दुपारी ४ वाजता संपर्क साधला असता त्या वेळी १०२ क्रमांकावर पूर्ण बेल वाजली मात्र यावेळी कोणीही प्रतिसाद दिला नाही.दुपारी ४.५५ वाजतादुपारी ४.५५ वाजता पुन्हा संपर्क साधला असता त्या वेळीही प्रतिसाद मिळाला नाही. या वेळी एका पाठोपाठ तीन ते चार वेळा पुन्हा पुन्हा संपर्क केला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव