अमळनेरात कुंटणखान्यावर धाड, मालकीण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:57 AM2018-12-17T00:57:18+5:302018-12-17T01:00:59+5:30

अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून मालकीणला अटक केली, तसेच दोन तरूणांवर गुन्हा दाखल केला. तर ४ पिडीत महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधार गृहात पाठविण्यात आले.

 Ambulance racket racket, ownership in custody | अमळनेरात कुंटणखान्यावर धाड, मालकीण अटकेत

अमळनेरात कुंटणखान्यावर धाड, मालकीण अटकेत

Next
ठळक मुद्देगांधलीपुरा भागात पोलिसांनी टाकला छापाचार महिलांची सुधारगृहात रवानगी

अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात पोलिसांनी छापा टाकून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक करून ‘पीटा’ कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, गांधलीपुरा भागात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून डीवायएसपी रफिक शेख आणि पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पथक तयार करून १६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जाकीराबी शकीलाबी शेख या महिलेच्या घरी छापा टाकला असता त्याठिकाणी साक्री तालुक्यातील उभांड वरधाने येथील हेमंत बन्सीलाल पाटील व धुळे तालुक्यातील वरखेडे येथील विकास धर्मा पडोळकर हे वेगवेगळ्या खोलीत पीडित दोन महिलांसोबत आढळून आले.
आणखी दोन पीडित महिला तेथे आढळून आल्या. पोलिस चौकशीत पीडित महिलांनी सांगितले की, घर मालकीण आमच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेते व ग्राहकाकडून मिळालेले ५०० रुपये पैकी मालकीण ३०० रुपये घेते आणि २०० रुपये आम्हाला देते. पोलिसांनी पीडितांचा जबाब घेऊन मालकीण जाकिराबी शेख शकीलाबी हिला ताब्यात घेतले. छापा टाकणाºया पथकात डीवायएसपी रफिक शेख, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, पीएसआय यशोदा कणसे, हेडकॉन्स्टेबल संगीता मोरे, विजय साळुंखे , किशोर पाटील , प्रदीप पवार, सुनील हटकर, रवींद्र पाटील , रेखा ईशी, योगेश महाजन , योगेश पाटील , प्रमोद पाटील, प्रवीण पारधी, सुनील पाटील आदींचा समावेश होता. पारोळा पोलीस स्टेशनच्या पीएसआय यशोदा कणसे यांनी फिर्याद दिल्यावरून जाकिराबी शेख हिच्याविरुद्ध महिलांचा अनैतिक व्यापार कायदा १९५६ च्या कलम ३, ४, ५,६, ७ प्रमाणे पीटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.
चारही पीडित महिलांना महिला सुधारगृहात रवाना करण्यात आले असून विकास व हेमंत या दोघांवर कलम ११२, ११७ प्रमाणे कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक बडगुजर यांनी सांगितले.

 

Web Title:  Ambulance racket racket, ownership in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :raidधाड