बोदवड येथील कोविड सेंटरवर रुग्णवाहिकाही पडली ‘आजारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:00 IST2020-06-22T15:59:45+5:302020-06-22T16:00:30+5:30
गैरसोय : कर्मचाऱ्यांचीही कमतरता असल्याने होतात हाल

बोदवड येथील कोविड सेंटरवर रुग्णवाहिकाही पडली ‘आजारी’
बोदवड : विविध अडचणींमुळे शहरातील आरोग्य यंत्रणेला आता सुविधांच्या ‘सलाईन’ ची नितांत गरज पडली आहे. या खेरीज रुग्णवाहिकेला सुद्धा आता नादुरुस्तीचा आजार जडला आहे.
अगोदरच गेल्या बावीस दिवसापासून ग्रामीण रुग्णालयात वैदकीय अधिकारी नसल्याने ते बंद पडले आहे, तर एक १०२ क्रमांकाची महिला प्रसूती साठी फिरती रुग्णवाहिका ही १९ रोजी बंद पडल्याने रात्री बोदवड येथील कोविड सेंटरला करंजी येथून कोरोंटाइन नागरिकांना आणण्यासाठी आरोग्य विभागाला रात्री कसरत करावी लागली, त्यात २१ सकाळी कोरना अहवालासाठी ५९ नागरिकांचे स्वब घेण्यासाठी आरोग्य विभागच्या एकाच प्रयोगशाळा कर्मचाºयाने मदतीला इतर पंचायत समितीचे आरोग्य कर्मचारी घेत सुमारे ५९ नागरिकांचे स्वब घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले.
कोविड सेंटर झाले फुल्ल
५९ नागरिक कोविड सेंटरला आल्याने कोविड सेंटर फुल्ल झाले तर शहरातील बरडीया शाळेत नवीन क्वारंंटाइन केंद्र सुरू केले आहे मात्र कर्मचारीही उपलब्ध नसल्याचे दिसून आले.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी मनोज चौधरी यांची प्रतिक्रिया घेतली असता जिल्हा आरोग्य विभागाला माहिती दिली असून प्रयोगशाळेच्या कर्मचाºया सोबत एक कर्मचारी आम्ही दिला असे सांगितले.