अमळनेरला सेनेचे जोडेमार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 20:55 IST2020-09-08T20:55:51+5:302020-09-08T20:55:57+5:30
कंगना राणावतचा निषेध : तहसीलदारांना दिले निवेदन

अमळनेरला सेनेचे जोडेमार आंदोलन
अमळनेर : मुंबई पोलिसांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी कंगना राणावतचा निषेध करत तालुका शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून कंगनाच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले.
अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तूलना पाकव्याप्त काश्मीरशी करून मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावला म्हणून शिवसेनेतर्फे तहसिल कार्यालयावर मोर्चा नेत आवाराबाहेर कंगनाच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
त्यांनंतर तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे याना देण्यात आले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पिंगळे, तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, युवासेना जिल्हाउपप्रमुख श्रीकांत पाटील, महिला जिल्हा संघटक मनीषा परब, शहर संघटक उज्वला कदम, महेश देशमुख, माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर, नगरसेवक प्रताप शिंपी, जीवन पवार, रामचंद्र परब , देवेंद्र देशमुख, मोहन भोई , रमेश पाटील , शिवकुमार पाटील, कुसुमबाई कुंभार, कमल काटकर, सूनुबाई सोनवणे, अंजुबाई शिंदे, कलाबाई पाटील, माधुरी कुलकर्णी, कमल केले, विमालबाई पाटील आदीसह कार्यकर्ते हजर होते.