अमळनेरात वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 03:36 PM2021-05-14T15:36:56+5:302021-05-14T15:37:42+5:30

अक्षय तृतीयेनिमित्त अमळनेर येथील वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण करण्यात आले.

In Amalnera, the pillar was erected by performing pooja in the village itself | अमळनेरात वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण

अमळनेरात वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण

Next

अमळनेर : कोरोनाच्या महामारीमुळे यात्रोत्सव बंद असल्याने परंपरेप्रमाणे संत सखाराम महाराज यात्रोत्सव होणार नसला तरी शुक्रवारी वाडी मंदिरातच पूजा करून स्तंभारोपण करण्यात आले.
दरवर्षी अक्षय्य तृतीयेपासून यात्रेला सुरुवात  होत असते. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्याने शासनाने यात्राेत्सवावर बंदी घातली आहे. मात्र परंपरेप्रमाणे सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज यांनी सकाळी मंदिरात विठ्ठल रुख्मिणीची पूजा केली. त्यानंतर मंदिराच्या आवारात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंग पाळून अभय देव, केशव पुराणिक, अभय गुरुजी, प्रशांत गुरुजी यांच्या हस्ते अन्नपूर्णा आणि स्तंभ पूजा करून स्तंभरोपण करण्यात आले. 
दरम्यान, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,  संजय चौधरी, पंडित चौधरी, नगरसेवक संजय पाटील, माजी नगरसेवक प्रताप साळी, संस्थानचे आप्पा येवले, राजेंद्र देशमुख, बापू देशमुख, अभिजित भांडारकर, अनिल जोशी, उदय देशपांडे, हरी भिका वाणी, पवन शेटे यांचा  प्रसाद महाराजांनी श्रीफळ व प्रसाद देऊन सन्मान केला.

Web Title: In Amalnera, the pillar was erected by performing pooja in the village itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.