अमळनेर तालुक्यात वादळी पावसाने झाडे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:10+5:302021-05-31T04:14:10+5:30

अमळनेर : तालुक्यात रविवारी, दि. ३० रोजी संध्याकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे पडली, तर काही ठिकाणी ...

In Amalner taluka, trees fell due to heavy rains | अमळनेर तालुक्यात वादळी पावसाने झाडे पडली

अमळनेर तालुक्यात वादळी पावसाने झाडे पडली

अमळनेर : तालुक्यात रविवारी, दि. ३० रोजी संध्याकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे पडली, तर काही ठिकाणी घरांचे , गोठ्यांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

तालुक्यात डांगर, जळोद, गंगापुरी, नालखेडा, मठगव्हान, रुंधाटी, पातोंडा, सावखेडा, मुंगसे, हेडावे, सुंदरपट्टी या भागात वादळी पाऊस झाला. डांगर येथे शेतांमध्ये पाणी साचून झाडे कोसळली. विजेचे खांब पडले. तारा तुटून पुरवठा खंडित झाला. हेडावे येथे रस्त्यावर झाडे पडून नाले वाहू लागले होते. या रस्त्यावरील एक हॉटेल आणि डेअरीचे नुकसान झाले आहे, तर सुंदरपट्टी गावाला घरांचे पत्रे, गोठ्याचे पत्रे उडून नुकसान झाले. वीज तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला.

===Photopath===

300521\30jal_15_30052021_12.jpg

===Caption===

अमळनेर तालुक्यात वादळी पावसाने झाडे पडली

Web Title: In Amalner taluka, trees fell due to heavy rains