शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अमळनेरात राजकारण्यांनी एकत्र येऊन केली दूध संघाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 21:39 IST

अमळनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन सुरू केलेल्या दूध संघास शासनाने हिरवा कंदील दिला असून कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने तापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास दूध संकलन व बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देतापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास मिळाली शासनाची परवानगीराजकारणी झाले एकत्रसर्वपक्षीय दूध संघाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे गोकुळ बोरसे तर कार्याध्यक्षपदी भाजपचे महेश पाटील

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन सुरू केलेल्या दूध संघास शासनाने हिरवा कंदील दिला असून कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने तापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास दूध संकलन व बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक दुग्धव्यवसाय करण्यास चालना मिळून शेकडो भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होणार आहे.सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सवार्नूमते हा दूध संघ स्थापन करण्यास मान्यता मिळाल्यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आमदार स्मिता वाघ यांची मुख्य प्रवर्तक म्हणून निवड करून त्यांच्यावर पुढील जवाबदारी टाकण्यात आली होती. त्यानुसार वाघ यांनी प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्रालयाकडे सुपूर्द केला होता.कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप नेते उदय वाघ यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय दूध उत्पादकांची बैठक घेण्यात आली. यात आमदार वाघ व उदय वाघ यांनी संस्थेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांंना संचालक म्हणून स्थान देण्याची भूमिका मांडली. यानुसार संघाच्या चेअरमनपदी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ नामदेव बोरसे (गडखांब), व्हाईस चेअरमनपदी अमळनेर येथील उद्योजक महेंद्र सुदाम महाजन तर कार्याध्यक्षपदी महेश उत्तमराव पाटील (लोण) यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर दूध संघाचे धोरण ठरविण्यात आले.बैठकीतील निर्णयानुसार असे असेल दूध संघाचे धोरणतापी सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघामार्फत सहा महिन्यांत दूध संकलन प्रकल्प क्षमता १० हजार लीटरपर्यंत करण्यात येणार आहे. तालुक्यात १० एकर जागेत प्रकल्प उभारला जाईल. दूध संघ कार्यान्वित झाल्यानंतर दीड हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अवर्षणप्रवण क्षेत्रातील दुष्काळग्रस्त बळीराजा साठी सदर दूध संघ आशेचा किरण ठरणार आहे. दूध संघामार्फत ग्रामीण दूध उत्पादक संस्थांचे बळकटीकरण व महिला बचत गटांचे सक्षमीकरण करून दूध संकलन करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे संघामार्फत शुद्ध व सुगंधी दुग्ध पदार्थांची निर्मिती करणे, त्याचप्रमाणे मिनरल वॉटर बॉटल प्लांट, पशुखाद्य उद्योग, इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच सदर प्रकल्पासाठी खुल्या आवाहनाद्वारे २५ हजार सभासद करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी ५० लाख सभासद भागभांडवल वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. एनडीडीबीमार्फत शासकीय अनुदान १७ कोटी ५० लाख आणि उर्वरित भांडवल दीर्घ मुदतीचे बँक कर्ज रु. पाच कोटी असा एकूण २५ कोटींचा हा प्रकल्प असणार आहे.बैठकीत बाजार समिती सभापती प्रप्फुल पवार, जि.प.सदस्या मीना पाटील, उपसभापती श्रावण ब्रम्हे, कृ.उ.बा.संचालक सुरेश पिरन पाटील, माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, काशिनाथ चौधरी, गिरीश सोनजी पाटील, देखरेख संघ चेअरमन विक्रांत पाटील, मार्केटचे माजी संचालक कामराज पाटील, भटा पाटील, रामकृष्ण पाटील, विठोबा महाजन, भगवान कोळी, शेतकी संघ माजी संचालक प्रा.श्याम पाटील, जितेंद्र राजपूत, गुलाबराव पर्वत पाटील, विजय कहारू पाटील, शिवसेनेचे किरण पवार, सचिन योगराज पाटील, भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख, सरचिटणीस जिजाबराव पाटील, एम डी.चौधरी, महेंद्र बोरसे, मधुकर कथ्थू पाटील, सदस्य नोदणी प्रमुख निवास मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणAmalnerअमळनेर