अमळनेर बाजार समिती संचालकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 20:14 IST2019-08-05T20:14:45+5:302019-08-05T20:14:53+5:30
अमळनेर : येथील बाजार समिती संचालकपदांच्या रिक्त जागेवर चार जणांची निवड सोमवारी करण्यात आली. संचालक उदय नंदकिशोर पाटील अपात्र ...

अमळनेर बाजार समिती संचालकांची निवड
अमळनेर : येथील बाजार समिती संचालकपदांच्या रिक्त जागेवर चार जणांची निवड सोमवारी करण्यात आली.
संचालक उदय नंदकिशोर पाटील अपात्र ठरल्यानंतर त्यांच्या जागेवर आटाळ्याचे सदा बापू पाटील, तर तज्ज्ञ संचालकांच्या रिक्त जागेवर डी.ए.धनगर (शिरूड), मुरलीधर महाजन (कळमसरे), एम.डी.चौधरी (जळोद) यांची निवड करण्यात आली. चारही नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, आमदार स्मिता वाघ, बाजार समिती सभापती प्रफुल पाटील, उपसभापती अॅड.एस.एस.ब्रम्हे, संचालक विश्वास पाटील, भगवान कोळी, महेश देशमुख, राहुल पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे, भाजपच्या शीतल देशमुख, विक्रांत पाटील, सचिव उन्मेष राठोड उपस्थित होते.
निवडणूक लढविणार नाही -साहेबराव पाटील
नवनियुक्त संचालकांच्या सत्काराप्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले, की आमदार स्मिता वाघ व उदय वाघ यांनी अनेकांना भाजपमध्ये आणून सर्व समाजातील व्यक्तींना विविध संस्थांमध्ये संधी दिली. त्यातून जातीयवादाला फाटा दिला आहे. त्यामुळे आमदार वाघ यांनाच विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्वांनी एकत्र लढावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतली असून भाजपने उमेदवारी दिली तरी घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.