अमळनेरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:25 IST2018-07-14T21:22:03+5:302018-07-14T21:25:19+5:30
अमळनेर येथे शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. धुळे रस्त्यावरील साई लॉजिंगवर धाड टाकून दोन महिलांना रंगेहाथ पकडण्यात आले.

अमळनेरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
जळगाव : अमळनेर येथे शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. धुळे रस्त्यावरील साई लॉजिंगवर धाड टाकून दोन महिलांना रंगेहाथ पकडण्यात आले. लॉजिंगचा व्यवस्थापक अंकुश दौलत पाटील (रा.मंगरुळ, ता.अमळेनर) याला अटक करण्यात आली असून मालक दिलीप टिल्लूराम ललवाणी (रा.न्यू.प्लॉट,अमळनेर) यालाही आरोपी करण्यात आले आहे. या लॉजिंगवर बचत गटाच्या गरजू महिला तसेच शहरातील उच्चभ्रू महिलांच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अमळनेर शहरात गेल्या काही महिन्यात दोन खुनाच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये पोलीस तपासात अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिलांचा संबंध जोडला गेल्याने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर लक्ष केंद्रीत करुन स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.