अमळनेर पालिकेतर्फे मोफत पाच वीज वाहन चार्जिंग केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 02:32 PM2021-01-26T14:32:08+5:302021-01-26T14:32:56+5:30

अमळनेर शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी वीज वाहन चार्जिंग केंद्रे तयार करण्यात येत आहेत.

Amalner | अमळनेर पालिकेतर्फे मोफत पाच वीज वाहन चार्जिंग केंद्रे

अमळनेर पालिकेतर्फे मोफत पाच वीज वाहन चार्जिंग केंद्रे

Next



अमळनेर : नगरपरिषदेतर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी माझी वसुंधरा उपक्रमान्तर्गत शहरात विजेवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी मोफत चार्जिंग करण्याचे 5 केंद्र  उभारण्यात येत आहे. यातील एका केंद्राचे उदघाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

      माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत ऊर्जा संवर्धनासाठी , प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी विजेवर चालणारी वाहने वापरण्यास प्रवृत्त व्हावे म्हणून शहरातील विविध चौकात 5  चार्जिं केंद्रे लावण्यात येणार आहेत. एका केंद्राची किंमत दीड लाख रुपये आहे मात्र विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांनी कमी खर्चात चार्जिंग केंद्र तयार केले असून एका केंद्रांवर 2 वाहने चार्जिंग करण्यात येतील एक वाहनांसाठी सुमारे 40 मिनिटे लागणार आहेत नागरिकांसाठी चार्जिंग व्यवस्था मोफत राहणार आहे. एकदा चार्जिं केल्यावर वाहन 40 ते 50 किमी चालेल अंडी त्यासाठी 4 ते 5 युनिट खर्च होतात. पालिकेने मोफत चार्जिंगची व्यवस्था केल्याने नागरिकांच्या खर्चात बचत होणार आहे त्यामुळे यावेळी आमदार अनिल पाटील यांनी शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी  नागरिकांचे आरोग्य अबाधित  ठेवण्यासाठी नागरिकांनी विजेची वाहने वापरण्याचे आवाहन केले 

      यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील , नगरध्यक्षा पुष्पलता पाटील , माजी नगरध्यक्षा जयश्री पाटील , माजी उपनगराध्यक्ष डॉ राजेंद्र पिंगळे ,जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी प्रांताधिकारी सुनील सूर्यवंशी ,डी वाय एस पी राकेश जाधव , तहसीलदार मिलिंद वाघ , मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील ,नगरसेवक मनोज पाटील , प्रवीण जैन , ए पी आय एकनाथ ढोबळे हजर  होते सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले.

Web Title: Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.