सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:13+5:302021-06-03T04:13:13+5:30
यावल : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडक निर्बंधात सलूनची दुकाने बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली ...

सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी
यावल : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडक निर्बंधात सलूनची दुकाने बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी येथील श्री जीवा महाले नाभिक संघटनेने केली आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पुणे, नाशिक, मध्य प्रदेशात सलून दुकानांना सुरू करण्याची परवानगी दिली आहे; मात्र जळगाव जिल्ह्यात ही परवानगी नाही. नाभिक समाज पूर्णपणे याच व्यवसायावर अवलंबून आहे. पोट भरण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. सततच्या बंदमुळे या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाकडून या व्यावसायिकांंना कोणतेही अनुदान दिले जात नाही. तरी सलून दुकाने त्वरित सुरू करण्यास परवानगी द्यावी.
निवेदनावर तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, सुपडू वारुळकर, रवींद्र आमोदकर, युरेश चौधरी, अनंता चौधरी, राहुल चौधरी, दिलीप चौधरी, सुनील सनंसे, रणजीत ठाकरे, ईश्वर सोनवणे, सुरेश चौधरी, शेख सलीम शेख शरीफ यांच्या सह्या आहेत.