जामनेर तालुक्यातील १३० शाळेत शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:30 IST2020-04-04T15:29:34+5:302020-04-04T15:30:40+5:30
जामनेर तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत मिळणाऱ्या तांदूळ व डाळी मालाचे जिल्हा परिषद व खासगी १३० शाळेत वितरण करण्यात आले.

जामनेर तालुक्यातील १३० शाळेत शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप
पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : जामनेर तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत मिळणाऱ्या तांदूळ व डाळी मालाचे जिल्हा परिषद व खासगी १३० शाळेत वितरण करण्यात आले.
सध्या कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे शासनाने १६ मार्चपासून शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे शाळांमध्येच शिल्लक असलेले पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना व पालंकाना वितरित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्याने या परिस्थितीत आदेशाची अंमलबजावणी करताना मुख्याध्यापक व शिक्षकांची दमछाक होत आहे.
३ एप्रिलपर्र्यंत १३० शाळेतील ११ हजार ७३० विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले. यात विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संपर्क टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गर्दी होणार नाही याची काळजी घेत ४९, ३५७ कि.ग्रॅ. तांदूळ व ९,५५७ कि.ग्रॅ. डाळीचे विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्यात आले.
यावेळी बºयाच ठिकाणी गटविकास अधिकारी लोखंडे व गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. संपूर्ण भारतभर लॉकडाऊन असल्याने तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी शिक्षकांना सहकार्य केल्याचे शालेय पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळी वाटप करण्यासंदर्भात शासनाचे आदेश आहे. त्यानुसार लॉकडाउनचे पालन करून तालुक्यातील १३० शाळेत आजअखेर वाटप करण्यात आली आहे. उर्वरित शाळांमध्ये माल पोहचत असून, लवकरच तीन-चार दिवसात वाटप पूर्ण होईल.
-विष्णू काळे, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जामनेर