आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.१६ : इमारत व बांधकाम कामगारांना साहित्य घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे प्रत्येक पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आठ कामगारांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. शेख असलम, शेख जुनेद, ईश्वर कुमावत, शेख साबीर, मुकीमोदीन शेख, शेख आसिफ, देवीदास बेलदार, शेख साबीर सुपडु अशा आठ कामगारांना ४० हजार रुपये मदत म्हणून देण्यात आले. उर्वरित अर्ज दाखल केलेल्या सर्व कामगारांना टप्याटप्याने मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी जितू पाटील, प्रा.शरद पाटील, खलील खान, समाधान वाघ, आत्माराम शिवदे, दीपक तायडे, खलिल पेंटर, अमोल पाटील, भगवान मिस्तरी, दीपक कुमावत, समाधान पाटील, हारून शेख यांच्यासह कामगार संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
जामनेरला इमारत बांधकाम कामगारांना मंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:08 IST
इमारत व बांधकाम कामगारांना साहित्य घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे प्रत्येक पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आठ कामगारांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
जामनेरला इमारत बांधकाम कामगारांना मंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप
ठळक मुद्देकामगार कल्याण मंडळातर्फे प्रत्येकी पाच हजारांची मदतआठ कामगारांना जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरणसर्व कामगारांना होणार टप्प्याटप्प्याने मदत