दोन नेत्यांचे शरसंधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:25+5:302021-06-21T04:13:25+5:30
कार्यकर्त्यांमध्ये ‘कहीं खुशी- कहीं गम’ पहायला मिळाले. विशेषत: हा रोख कोणावर होता हे सांगणे न लगे. ...

दोन नेत्यांचे शरसंधान
कार्यकर्त्यांमध्ये ‘कहीं खुशी- कहीं गम’ पहायला मिळाले. विशेषत: हा रोख
कोणावर होता हे सांगणे न लगे. शनिवारीच शिवसेनेचा वर्धापनदिन होता. यानिमित्ताने नेत्यांना टीकाटिपण्णीची आयतीच संधी मिळाली आणि ती त्यांनी सोडलीही नाही. दोन नेत्यांनी एकाच ठिकाणीहून तोफगोळे सोडले. पहिल्यांदा आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. आपल्याला दाबले जात आहे...असे सांगून त्यांनी स्वकीयांचेच जोरदार शरसंधान केले. इकडे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे पारोळ्यात आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांनीही मग संधी साधली आणि शिवसेनेत फक्त काम करणाऱ्यांना संधी दिली जात असल्याचे सांगून टाकले. इकडे आमदार पाटील यांनी शिवसेनेत शिवसेनेत गेली पन्नास वर्षे एक नेता, एक वक्ता, एक संघटना असल्याचे सांगितले. दुसरीकडे नेते दुसरेच सांगत आहेत. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.
- चुडामण बोरसे