अष्टपैलू शलाका हिवाळेची राष्ट्रीय पातळीवर भरारी

By Admin | Updated: January 12, 2015 13:33 IST2015-01-12T13:33:05+5:302015-01-12T13:33:12+5:30

केवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरातूनच नव्हे तर नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातूनही युवा क्रिकेट खेळाडू भरारी घेत आहे. याचा अनुभव शहरातील शलाका मधुकमल हिवाळे या युवतीच्या रूपातून आला आहे.

All-round Shalaka winter time at the national level | अष्टपैलू शलाका हिवाळेची राष्ट्रीय पातळीवर भरारी

अष्टपैलू शलाका हिवाळेची राष्ट्रीय पातळीवर भरारी

 नंदुरबार -  केवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरातूनच नव्हे तर नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातूनही युवा क्रिकेट खेळाडू भरारी घेत आहे. याचा अनुभव शहरातील शलाका मधुकमल हिवाळे या युवतीच्या रूपातून आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात स्थान मिळविले. आता भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी तिची धडपड सुरू आहे.
सोमवारी सार्ज‍या होणार्‍या युवक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. 
वयाच्या अकराव्या वर्षांपासून तिने लेदरबॉलने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. दोन वर्षे जिल्हा व विभाग स्तरावर सहभागी झाल्यानंतर तिची सन २0१0-११ मध्ये महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाच्या सराव शिबिरात निवड झाली. यानंतर त्यापुढील वर्षी २0११-१२ मध्ये नाशिक येथे राज्यस्तरावर अष्टपैलू खेळाचे दर्शन घडविले. याआधारे त्याच वर्षी १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघात तिची वर्णी लागली. यानंतर २0१२-१३, २0१३-१४ व २0१४-१५ अशी सतत तीन वर्षे तिने महाराष्ट्र संघात स्थान प्राप्त केले. यादरम्यान २0१३-१४ मध्ये महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद मिळविले. त्यात तिने केलेल्या गोलंदाजीच्या आधारे सामन्याला कलाटणी देण्यात यश मिळविले होते. सध्या गेल्या दोन वर्षांपासून ती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात खेळत आहे. क्रिकेट खेळत असतानाच ती डॉजबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी झालेली होती. याशिवाय व्हॉलिबॉल, हॅण्डबॉल या खेळांमध्येही तिने राज्यस्तरावर सहभाग नोंदविला आहे.
भविष्यात शलाकाला देशाकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने तिची तयारी सुरू आहे. त्यासाठी ती दररोज सकाळी दोन ते तीन तास किक्रेटचा सराव करते. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शिबिरात ज्या पद्धतीने सराव करून घेतात त्याच पद्धतीचा सराव ती रोज मिशन हायस्कूलच्या मैदानावर करते. तसेच रोज दोन ते तीन किलोमीटर रनिंग करते. सरावापूर्वीचा व्यायाम झाल्यानंतर ती फिल्डिंगची तसेच कॅचची प्रॅक्टिस करते. नंतर ती सतत एक तास गोलंदाजीची प्रॅक्टिस करते व नंतर तेवढाच वेळ फलंदाजी करते. सरावादरम्यान अडचण आल्यास तिला तिचे वडील तथा कोच डॉ.मधुकमल हिवाळे व औरंगाबादमधील कोच लव्हेरा तिला मार्गदर्शन करतात. 

उत्कृष्ट मध्यम गती गोलंदाज, सहाव्या क्रमांकावर फलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारी शलाका हिवाळे हिची अष्टपैलू खेळाडू कामगिरी झालेली आहे. अष्टपैलू खेळाडू शलाकाला चांगला खेळाडू बनण्यासाठी लहानपणापासूनच खेळात आवड निर्माण केली व रोज सराव केल्यानंतरच यश मिळेल, याची वेळोवेळी जाणीव करून देतो. सतत पाच वर्षे रोज सकाळी दोन ते तीन तास सराव करून घेत आहे. या दरम्यान राज्य व राष्ट्रीय पातळीवर टिकून राहण्यासाठी जे कौशल्य लागते याकडे आपण लक्ष देतो. तिच्या होणार्‍या चुका निदर्शनास आणून देतो.
-डॉ. मधुकमल हिवाळे, 
शलाकाचे वडील तथा कोच रवींद्र मोराणकर

Web Title: All-round Shalaka winter time at the national level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.