जळगाव : आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटी सलग तीन दिवस सुट्या आल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यास अडचण येऊ नये म्हणून जिल्हा सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व २३९ शाखा सुट्टीच्या तीन दिवस सुरू राहणार आहे.
शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची ३१ मार्चपर्यंत परतफेड करावी लागते. त्यात या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात २७ मार्च रोजी चौथा शनिवारी, २८ रोजी रविवार तसेच २९ रोजी धुलीवंदनची सुट्टी आली आहे. शेतकऱ्यांना ३१ मार्च अखेर आपले कर्ज भरता आले पाहिजे यासाठी सुट्ट्या या तीन दिवस जिल्हा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व २३९ शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांना आता सुट्टीच्या दिवशी देखील आपले कर्ज भरता येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.