जळगाव तालुक्यात 11 ग्रामपंचायतसाठी दाखल सर्व 280 अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:31 IST2017-12-13T12:31:13+5:302017-12-13T12:31:36+5:30
पळसोद ग्रामपंचायत बिनविरोध

जळगाव तालुक्यात 11 ग्रामपंचायतसाठी दाखल सर्व 280 अर्ज वैध
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13- तालुक्यातील 11 ग्रामपंचायतसाठी दाखल एकूण 280 अर्जाची मंगळवारी छाननी करण्यात आली. यामध्ये सर्वचे सर्व अर्ज वैध ठरले आहे. दरम्यान, पळसोदला सरपंचपदासाठी एकमेव अर्ज तर सदस्यपदासाठी आलेले 7 अर्ज छाननीत वैध ठरल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाला.
जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु आह़े यात सरपंचपदासाठी 45 तर सदस्यपदासाठी 235 अर्ज प्राप्त झाले. अर्ज दाखल करण्यास 5 डिसेंबर पासून प्रारंभ झाला होता. यात धामणगाव सरपंचपदासाठी 7, सदस्यपदासाठी 26 अर्ज, निमगाव बु. ला सरपंचपदासाठी 3 व सदस्यपदासाठी 8, खेडी खुर्द ग्रा.पं.त सरपंचपदासाठी 3 व सदस्यपदासाठी 24, बिलवाडी सरपंचपदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 26 अर्ज, सुभाषवाडी सरपंचपदासाठी 5, सदस्यपदासाठी 38 अर्ज, डोमगावला सरपंचपदासाठी 4, सदस्यपदासाठी 15, पाथरी ला सरपंचपदासाठी 7 तर सदस्यपदासाठी 36, लोणवाडी बु।।ला सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदासाठी 11, विटनेर सरपंचपदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 33, जामोदला सरपंचपदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 11 अर्ज असे एकूण 280 अर्ज प्राप्त झाले होते.
या सर्व अर्जाची मंगळवारी छाननी झाली. यात एकही अर्ज अवैध ठरला नाही. त्यामुळे 11 ग्रामपंचायतसाठी 280 उमेदवारांचे अर्ज असून आता माघारीकडे लक्ष लागलेले आहे.
पळसोदला सरपंचपदी राधाबाई पाटील
पळसोद ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी राधाबाई पंकज पाटील यांचा एकमेव अर्ज तर सात ग्रा़पं़ सदस्य पदासाठी सातच अर्ज आलेले होते. हे सर्व अर्ज वैध ठरल्याने सरपंचपजी राधाबाई पाटील तसेच सात सदस्यांच्या बिनविरोध निवडवर शिक्कामोर्तब झाला.