शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

यंत्रणांना सतर्कतेचा इशारा, मुख्यालय सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:04 IST

‘निसर्ग’च्या पार्श्वभूमीवर दक्षता : निम्म्याहून अधिक जिल्हा प्रभावित होण्याची शक्यता

जळगाव : निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात ४ जून रोजी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविला जात असून त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.या संदर्भात जि.प., पोलीस प्रशासन, सर्व प्रांत कार्यालय तसेच सर्व तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे. या वादळामुळे जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, पारोळा, भडगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा, यावल हे तालुके प्रभावित होण्याची शक्यता असून उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाभरात दक्षता घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत आपापले मुख्यालय सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशान्वये निवासी उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पाटील यांनी ५ जूनपर्यंत सर्व तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोठेही काही घडल्यास सतर्कता राहावी म्हणून या नियंत्रण कक्षात रोज रात्री दर दोन तासांनी तपासणी करून घेतली जाणार आहे.नऊ तालुक्यांना धोकाया वादळामुळे जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, पारोळा, भडगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा, यावल हे तालुके प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व तालुक्यांसह इतरही सर्वच तालुक्यांमध्ये खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.नदी, धरणे, तलाव असलेल्या भागात अलर्टचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वरील यंत्रणांनी त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व यंत्रणांना या बाबत सावधानता बाळगण्याच्या सूचना द्याव्या, असेही कळविण्यात आले आहे. विशेषत: तालुक्यातील नदी, धरणे, तलाव असलेल्या भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सतर्क राहण्याच्याही सूचना दिल्या आहेत. जिल्हाभरात सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवून शोध व बचाव गट कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले आहे.विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नयेजिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सातत्याने संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला त्वरित माहिती द्यावी तसेच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव