मद्यपींची दुचाकी धडकली महिलेच्या दुचाकीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST2020-12-08T04:13:47+5:302020-12-08T04:13:47+5:30
जळगाव : दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या दुचाकीवरील तिघांनी समोर चालणाऱ्या महिलेच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. लक्ष्मी ओगल ...

मद्यपींची दुचाकी धडकली महिलेच्या दुचाकीवर
जळगाव : दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या दुचाकीवरील तिघांनी समोर चालणाऱ्या महिलेच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. लक्ष्मी ओगल पांचाळ व त्यांचा मुलगा सचिन (रा.न्यू.जोशी कॉलनी) हे जखमी झाले. सचिन याच्या नाकातोंडाला जबर दुखापत झाली असून दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी पांडे चौकात झाला.
न्यू.जोशी कॉलनीतील रहिवासी लक्ष्मी पांचाळ या मुलगा सचिन याच्यासोबत औषधी घेण्यासाठी दुचाकीने (क्र.एम.एच १९ डी.डी ४४१८) शहरात आल्या होत्या. औषधी घेतल्यानंतर त्या पोस्ट ऑफिसकडून दुचाकीने घरी जात असतांना मागून भरधाव ट्रिपलसीट येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात लक्ष्मी पांचाळ व त्यांचा मुलगा रस्त्यावर पडले. यात लक्ष्मी पांचाळ यांचा हात व पाय फ्रॅक्चर झाला असून सचिन याच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या दोघं जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातानंतर पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.