मद्यपी ट्रक चालकाने उडविले दुचाकीवरील पिता-पुत्राला
By Admin | Updated: June 28, 2017 16:49 IST2017-06-28T16:49:06+5:302017-06-28T16:49:06+5:30
राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

मद्यपी ट्रक चालकाने उडविले दुचाकीवरील पिता-पुत्राला
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.28 - शोरुममधून नवी दुचाकी खरेदी करुन भुसावळ येथे घरी जात असलेल्या स्केटल्र्ड स्टुवर्ट व त्यांचा मुलगा ब्रेट स्टुवर्ट (रा.शांतीनगर, भुसावळ) या पिता-पुत्राला मागून आलेल्या ट्रकने बुधवारी दुपारी 1 वाजता राष्ट्रीय महामार्गावरील अशोक लिलाडजवळच्या शोरुमसमोर जोरदार धडक दिली. नशिब बलवत्तर म्हणून दोघांना खरचटलेही नाही, मात्र नव्या दुचाकीचे नुकसान झाले आहे.
भुसावळ येथील शांतीनगर मधील रहिवाशी स्केटल्र्ड स्टुवर्ट व त्यांचा मुलगा ब्रेट स्टुवर्ट हे दोघे बुधवारी सकाळी जळगाव येथे नवीन दुचाकी घेण्यासाठी आले होते. कागदपत्रांची पूर्तता करून दुपारी साडे बारा वाजता होन्डा शोरूममधून दुचाकी घेतली. ही नवीन दुचाकी घेऊन दोघे भुसावळ येथे घरी जात असताना मागून भरधाव येणा:या ट्रकने (एच.आर. 66 ए 8536 ) त्यांना जोरदार धडक दिली. ट्रक चालक हा मद्याच्या नशेत होता असे सांगण्यात आले.