शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा घाटात महिलेला मारून फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 16:17 IST

अजिंठा घाटातील अजिंठा ते फर्दापूर राज्यमार्गावरील पहिल्या वळणावर २० ते ३५ वयोगटातील महिलेला मारून फेकून दिलेले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देमृत महिलेच्या तपासासाठी औरंगाबाद पोलीस जळगावातमहिला जळगावची असल्याचा पोलिसांचा अंदाजपुरावा नष्ट करण्याच्या हेतून आरोपींनी फेकून दिले कपडे

जळगाव : अजिंठा घाटातील अजिंठा ते फर्दापूर राज्यमार्गावरील पहिल्या वळणावर २० ते ३५ वयोगटातील महिलेला मारून फेकून दिलेले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. ही महिला जळगाव जिल्ह्यातील असल्याचा संशय पोलिसांना असून त्याच्या तपासासाठी औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस गुरुवारी शहरात दाखल झाले.अजिंठा घाटातील संरक्षण भिंतीच्या बाजूला हा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेच्या अंगावरील कपडे काढून फेकून देण्यात आलेले आहेत. या महिलेची अंदाजे पाच फूट उंची आहे. उजव्या हाताच्या मनगटावर लाल रंगाचा दोरा तसेच निळसर व काळ्या रंगाची बांगडी असून त्यावर सोनेरी ठिपके आहेत. दोन्ही कानात पिवळ्या रंगाच्या धातूच्या वस्तू आहेत.सिल्लोड पोलिसांच्या पथकाने शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हरविलेल्या महिलेबाबत माहिती घेतली. जिल्ह्यात कुठे नोंद आहे का? याची माहिती घेतली जात आहे.हरविलेल्या महिलांची घेतली माहितीओळख पटू नये म्हणून संशयितांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा मृतदेह अर्ध नग्न अवस्थेत फेकून दिला आहे. चार दिवसांपूर्वी अजिंठा घाटात अपघात झाला होता, तेव्हा पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. ही महिला जळगाव जिल्ह्यातील असावी अजिंठा पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक के.डी. आहेर यांचे एक पथक गुरुवारी जळगाव शहरात पाठविले.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू