जळगाव येथून हवाई वाहतूक: ‘उडान’ समितीचे पथक करणार पाहणी
By Admin | Updated: February 27, 2017 14:31 IST2017-02-27T14:31:05+5:302017-02-27T14:31:05+5:30
केंद्र सरकारच्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालय व भारतीय विमानतळ प्राधिकरणासमोर क्षेत्रीय हवाई संपर्क अभियानासंदर्भात स्थानिय स्तरावर हवाई वाहतुकीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत.

जळगाव येथून हवाई वाहतूक: ‘उडान’ समितीचे पथक करणार पाहणी
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 27 - जळगाव विमानतळावरुन स्थानिक उड्डाणांची सुविधा सुरु करण्यासंदर्भात आवश्यक त्या पूर्ततांची तपासणी करण्यासाठी स्थानिय संपर्क अभियान (Regional Connectivity Scheme) अर्थात उडान (UDAN)अभियानाअंतर्गत संयुक्त समिती जळगाव येथे मंगळवार दि.28 रोजी दाखल होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
केंद्र सरकारच्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालय व भारतीय विमानतळ प्राधिकरणासमोर क्षेत्रीय हवाई संपर्क अभियानासंदर्भात स्थानिय स्तरावर हवाई वाहतुकीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. त्याअंतर्गत जळगाव विमानतळावरुन वाहतुक सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
त्या प्रस्तावानुसार जळगाव विमानतळावरील प्रवासी वाहतुकीसंदर्भात आवश्यक त्या पूर्ततांची तपासणी ही समिती सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळात करेल. या समितीत नागरी हवाई उड्डाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी ही तपासणी करतील. त्यांचे समवेत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, उपविभागीय अधिकारी, पोलीस दलाचे अधिकारी, हवामान विभागाचे अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी आदीही या पाहणीत सहभागी होतील.