वर्षभरात एड्सने 194 जणांचा बळी
By Admin | Updated: December 1, 2015 00:33 IST2015-12-01T00:33:21+5:302015-12-01T00:33:21+5:30
एड्स (एचआयव्ही)ने गत 11 महिन्यात जिल्ह्यात तब्बल 194 जणांचा बळी घेतला आहे.

वर्षभरात एड्सने 194 जणांचा बळी
रवींद्र मोराणकर ल्ल नंदुरबार एड्स (एचआयव्ही)ने गत 11 महिन्यात जिल्ह्यात तब्बल 194 जणांचा बळी घेतला आहे. मागील आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण कमी दिसत असले तरी एवढय़ा मोठय़ा संख्येने नागरिक एड्स आजाराने मृत्युमुखी पडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असुरक्षित लैंगिक संबंधासह इतर कारणांनी होणा:या एड्स आजार नियंत्रणासाठी 1982 साली जागतिक आरोग्य संघटनेने कार्यक्रम तयार केला. एड्स नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावरही नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल 2002 पासून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गेल्या 14 वर्षात नंदुरबार जिल्ह्यात एक लाख 91 हजार 776 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात चार हजार 648 रुग्ण एचआयव्ही बाधित असल्याचे आढळले. याशिवाय एक लाख 89 हजार 833 गरोदर मातांचीही तपासणी करण्यात आली. त्यातील 280 माता ह्या एचआयव्ही बाधित असल्याचे आढळले. गेल्या 14 वर्षातील आकडेवारी नजर फिरविली तर 2002 मध्ये 135 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील 48 जण एचआयव्ही बाधित असल्याचे आढळले होते. हे प्रमाण 35.5 टक्के होते. यानंतर पाच वर्षानी 2007 मध्ये 989 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 296 रुग्ण हे एचआयव्ही बाधित आढळले होते. हे प्रमाण 29.92 टक्के होते. जानेवारी 2015 ते 30 सप्टेंबर 2015 या काळात 30 हजार 927 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 233 एचआयव्ही बाधित आढळले. हे प्रमाण 0.75 टक्के होते. तालुकानिहाय विचार करता, जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक अर्थात तीन हजार 184 एचआयव्ही बाधित आढळले आहेत. यात एक हजार 892 पुरुष, एक हजार 91 महिला, 119 लहान मुले व 82 लहान मुलींचा समावेश आहे. नंदुरबार खालोखाल शहादा तालुक्यात 420, तळोद्यात 304, नवापुरात 302, अक्कलकुव्यात 94 व धडगाव तालुक्यात 50 एचआयव्ही बाधित आढळले आहेत. गत 14 वर्षात एचआयव्ही एड्सने चार हजार 354 रुग्णांचा बळी गेला असून, त्यात दोन हजार 727 पुरुष, तर एक हजार 627 महिलांचा समावेश आहे. तथापि, गेल्या 11 महिन्यात एकूण 194 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 130 पुरुष, तर 64 महिलांचा समावेश आहे. एचआयव्ही बाधितांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, घरकूल योजना, बालसंगोपन अशा काही योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. नऊ हजार 217 पैकी चार हजार 746 रुग्ण शासनाच्या योजनांचा लाभ घेतात. काही जण भेदभाव होण्याच्या भीतीने योजनांचा लाभ घेण्यास कां कू करतात, असे दिसून आले आहे, असे जिल्हा रुग्णालयातील एचआयव्ही एड्स विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक यांनी सांगितले.