नाशिक येथे १५ डिसेंबरला अहिराणी कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 18:16 IST2019-12-11T18:15:28+5:302019-12-11T18:16:19+5:30

महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ धुळे शाखा नाशिकच्या वतीने १५ डिसेंबर रोजी नाशिक येथे अहिराणी कवी संमेलन आयोजित केले आहे.

Ahirani Poets Meeting on 3rd December in Nashik | नाशिक येथे १५ डिसेंबरला अहिराणी कविसंमेलन

नाशिक येथे १५ डिसेंबरला अहिराणी कविसंमेलन

ठळक मुद्देअमळनेरचे ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्यासह प्रा.वा.ना.आंधळे, प्रा.तानसेन जगताप यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार जाहीरस्वागताध्यक्षपदी शिंदखेडा येथील सुदाम महाजन यांची निवड

अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ धुळे शाखा नाशिकच्या वतीने १५ डिसेंबर रोजी नाशिक येथे अहिराणी कवी संमेलन आयोजित केले आहे. त्यात खान्देशातील साहित्यिकांना ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे
कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक कीर्तनकार प्रा.चत्रभुज सोनवणे यांची निवड झाली आहे. खान्देशातील राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (अमळनेर ), सुनंदा वैद्य (धुळे), प्रभा बँकर (धुळे), प्रा.वा.ना.आंधळे (जळगाव), प्रा.तानसेन जगताप (चाळीसगाव), रामदास वाघ (धुळे), डॉ.रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) आदींचा ‘खान्देश भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन मंत्रालयातील स्वीय सहायक राजेंद्र गोसावी यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे आयोजन केंद्रीय अध्यक्ष प्रा.सदाशिव सूर्यवंशी व नाशिकच्या जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांनी केले आहे.

Web Title: Ahirani Poets Meeting on 3rd December in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.