अहिल्याबाई पावरा धडगावच्या पहिल्या नगराध्यक्षा
By Admin | Updated: February 10, 2016 00:41 IST2016-02-10T00:41:53+5:302016-02-10T00:41:53+5:30
धडगाव : येथील नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान काँग्रेसच्या अहिल्याबाई इंद्रसिंग पावरा यांना मिळाला, तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचेच मतीन शेख निवडून आले.

अहिल्याबाई पावरा धडगावच्या पहिल्या नगराध्यक्षा
धडगाव : येथील नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान काँग्रेसच्या अहिल्याबाई इंद्रसिंग पावरा यांना मिळाला, तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचेच मतीन शेख निवडून आले. मंगळवारी दुपारी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे अहिल्याबाई पावरा यांनी, तर राष्ट्रवादीतर्फे कल्पना पावरा यांनी अर्ज भरला. अहिल्याबाईंना नऊ, तर कल्पनाबाईंना आठ मते मिळाली. उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे मतीन शेख यांना नऊ, तर राष्ट्रवादीचे प्रल्हाद भोई यांना आठ मते मिळाली. यात अहिल्याबाई पावरा व मतीन शेख विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिका:यांनी घोषित केले.