पहूर येथे साकारणार अहिल्याबाई होळकरांचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:18+5:302021-08-17T04:23:18+5:30

पेठ ग्रामपंचायतीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी किरण भास्कर पाटील ...

Ahilyabai Holkar's memorial to be erected at Pahur | पहूर येथे साकारणार अहिल्याबाई होळकरांचे स्मारक

पहूर येथे साकारणार अहिल्याबाई होळकरांचे स्मारक

पेठ ग्रामपंचायतीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी किरण भास्कर पाटील होते. यादरम्यान उत्तर महाराष्ट्र धनगर समाज समिती प्रमुख रामेश्वर पाटील व माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे यांनी सांगितले की, येणाऱ्या पिढीला व समाजाला अहिल्याबाईंच्या कार्याचे स्मरण राहण्यासाठी पेठ गावातील अहिल्याबाई होळकर नगरात समाजबांधवांनी लोकसहभागातून होळकर यांच्या भव्य स्मारकाचे काम हाती घेतले व ते पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. लेले यांच्या रुग्णालयाजवळील चौकाचे सौंदर्यीकरण करून त्याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे व त्याचे अहिल्याबाई होळकर असे नामकरण करणार असल्याचे रामेश्वर पाटील यांनी सरपंच नीता पाटील यांच्या वतीने सांगितले.

याप्रसंगी उपसरपंच श्यामराव सावळे, लेले विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवा अध्यक्ष शैलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, शेतकी संघ संचालक साहेबराव देशमुख, कसबेचे सरपंच राजू जाधव, सलीम शेख गणी, अब्बु तडवी, संदीप बेढे, रवींद्र मोरे, ईश्वर देशमुख, शांताराम पाटील, सोनू बाविस्कर उपस्थित होते.

सूत्रसंचालन भाजप तालुका युवा सरचिटणीस चेतन रोकडे यांनी तर आभार ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे यांनी मानले.

160821\16jal_4_16082021_12.jpg

पहूर येथे साकारणार अहिल्याबाई होळकरांचे स्मारक

Web Title: Ahilyabai Holkar's memorial to be erected at Pahur