शेती डाळिंबाची

By Admin | Updated: May 30, 2017 17:32 IST2017-05-30T17:32:11+5:302017-05-30T17:32:11+5:30

शेतीवाडी या सदरात उत्तमराव मनगटे, सातगाव (डोंगरी), ता.पाचोरा यांनी केलेले लिखाण

Agriculture Pomegranate | शेती डाळिंबाची

शेती डाळिंबाची

 पिंप्री साव्रे (ता.पाचोरा) तसे लहानसे गाव. पाचो:यापासून पंधरा कि.मी.वर वसलेलं. जळगाव आणि औरंगाबाद हद्दीच्या जवळपास़ या गावात शेती उत्तमप्रकारे केली जाते. गावालगत मध्यम प्रकल्प असल्याने ब:यापैकी पाणीसाठा असतो. या वर्षी दुष्काळातही या प्रकल्पाचं पाणी काही प्रमाणात शिल्लक असल्याने नव-जुनं पाणी एकमेकाला भेटलं. या गावात अनेक जण आदर्श शेती करणारे आहेत. त्यापैकी उत्तम अशी डाळिंबाची शेती कसणारे नाना सुकदेव पाटील हे एक होय.

पाटील हे लहानपणापासूनच शेतीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांनी अनेक पिके चांगल्या पद्धतीने घेतलेली आहेत. शेती करत असतानाच एकेदिवशी त्यांच्या लक्षात आले की, इतर फळबाग पिके घेत असताना डाळिंबाचीही शेती करावी़ ज्या-ज्या ठिकाणी डाळिंबाची शेती आहे, त्या-त्या ठिकाणी जाऊन त्यांनी माहिती घेऊन अभ्यास केला. अभ्यासानंतर जून 2014 ला सहा एकरमध्ये जैन टिश्यू कल्चरचे 35 रु. कलमप्रमाणे 2000 झाडे लावली. यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. 
प्रसंगी काही प्रमाणात रासायनिक खतेही दिली. वेळोवेळी फवारणीची गरज असताना तेही केले. लागवडीनंतर 15 महिन्यांनंतर पहिला बहार येण्यास सुरुवात केली. डाळिंबाचे पीक परिपक्व होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. डाळिंबाचा आकार मोठा व भगवा असल्याने काही व्यापारी शेतावर येऊन डांिळंब खरेदी करत आहेत़ त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाचला, असे पाटील म्हणाले. नंतरचा माल मालेगाव येथे नेऊन 40 रु. किलोने 
त्यांनी विकला़  संपूर्ण एकूण सोळा टन आल्याचे पाटील म्हणाले. पहिला बहार असल्याने काही झाडांचे उत्पन्न कमी आल़े आता यापुढे दुप्पटीने उत्पन्न निघण्याची अपेक्षा  त्यांनी व्यक्त केली़ इतर शेतक:यांनी आपल्यापासून कोणती प्रेरणा घ्यावी?  शेतक:यांना जिवंत राहावयाचे असेल, तर शेतीचे वेळापत्रक बनवावे, पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी खतांचे, पाण्याचे व औषधींचे नियोजन करावे, असे ते म्हणाल़े
प्रत्येकाला दोन-चार एकर शेती असल्याने शेळीपालन, बोकडे पालन, कोंबडी पालन, मत्स्य पालन व्यवसाय, गीरगाई पालन असे छोटे-मोठे जोडधंदे जर पूरक व्यवसाय म्हणून केले तर शेतकरी आत्महत्या हा विषयच उरणार नाही.
उत्तम शेती करताना राजकारणात पडून वेळ वाया घालवू नये. शेती खर्चावर बंधन घाला. सेंद्रिय शेती पद्धतीला प्राधान्य द्या. मालविक्रीसाठी शासनाने हमीची बाजारपेठ द्यावी. शासनाने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.
 

Web Title: Agriculture Pomegranate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.