शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींकडून ब्रोकरला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:57 IST

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी गाळ्यांची भाडे वाढ केल्याची तक्रार माजी मंत्री सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केल्याचा राग आल्याने बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर व अविनाश भालेराव यांनी ब्रोकर प्रकाश लालचंद जैन (रा.अयोध्या नगर, जळगाव ) यांना मारहाण केल्याची घटना ...

ठळक मुद्देतक्रारीचा रागगाळ्याबाबत ३० वर्षाचा करार

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी गाळ्यांची भाडे वाढ केल्याची तक्रार माजी मंत्री सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केल्याचा राग आल्याने बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर व अविनाश भालेराव यांनी ब्रोकर प्रकाश लालचंद जैन (रा.अयोध्या नगर, जळगाव) यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसीतील गुरांच्या बाजार समोर घडली. दरम्यान, याप्रकरणी जैन व भालेराव यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रार दिली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजता प्रकाश जैन हे घरी जात असताना गुरांच्या बाजार समोर बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील व संचालक वसंत भालेराव यांचा मुलगा अविनाश भालेराव हे कारमधून आले व तु आमच्याविरुध्द सुरेशदादा जैन यांच्याकडे तक्रार केली असे म्हणत शिविगाळ करुन मारहाण केली. या भांडणात हातातील सात ग्रॅमची सोन्याची अंगठी, गळ्यातील १२ ग्रॅमची सोन्याची साखळी गहाळ झाली तसेच अंगावरील कपडेही फाटले असे प्रकाश जैन यांनी तक्रारीत म्हटले आहे.जैन यांनी कार अडविल्याची तक्रारसभापती लक्ष्मण पाटील यांच्यागटाकडून अविनाश भालेराव यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सभापती लक्ष्मण पाटील, उपसभापती मनोहर पाटील, अनिल भोळे, कैलास चौधरी व जितेंद्र मुंदडा असे कारने जात असताना रस्त्यात गाडी अडवून दुकानाचे भाडे का वाढविले म्हणून शिविगाळ करायला सुरुवात केली. त्यांना समजावून सांगत असताना भालेराव यांना मारहाण केली. त्यात धक्का लागल्याने जैन हे गटारीत पडल्याने त्यांच्या पायाला खरचटल्याचे म्हटले आहे.काय आहे प्रकरणकृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील गाळ्यात प्रकाश जैन यांचे कार्यालय आहे. या गाळ्याबाबत ३० वर्षाचा करार झालेला आहे. सुरुवातीला ५० रुपये महिना असे भाडे होते तर सध्या २२५ रुपये भाडे आकारले जात आहे. गेल्या महिन्यात दुकानांचे भाडे १ हजार २०० रुपये इतके करण्यात आल्याची नोटीस बाजार समितीने दुकानदारांना दिली. ही भाडे वाढ दुकानदारांना मान्य नसल्याने बाजार समितीचे सचिव तसेच माजी मंत्री सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.त्यावरुन हा वाद झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव