कढोली येथे कृषी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:19+5:302021-09-24T04:18:19+5:30
कढोली, ता. एरंडोल : म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी ...

कढोली येथे कृषी मार्गदर्शन
कढोली, ता. एरंडोल : म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी दीपाली अंकुश पाटील हिचे ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कृषी औद्योगिक संलग्नता सन २०२१-२२ अंतर्गत कढोली येथे शेतकऱ्यांना कोरोना व कोविड लसीकरण जनजागृती केली. सोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बीज प्रक्रिया, माती परीक्षण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, औषध फवारणी करताना घ्यावयाची काळजी, चारा प्रक्रिया अशा विविध विषयांवर प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी शेतकरी निंबा बडगुजर, भरत कोळी, किशोर कोळी, रमेश पाटील, ग्रामसेवक एम. एम. मेढे, सुरेश बडगुजर व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश तायडे, समन्वयक प्रा. अनिल फापडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब मुंडे, प्रा. मोनिका भावसार, प्रा. विशाल दळवी, प्रा. वैशाली राणे, प्रा. अविनाश पासेकर व प्रा. सुरेंद्र इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले.