वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:13+5:302021-06-26T04:13:13+5:30

जळगाव : जळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासंदर्भात जेट सर्व्ह एव्हिएशन प्रा.लि. आणि जळगाव विमानतळाचे संचालक यांच्यात करार ...

Agreement to establish a pilot training center | वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी करार

वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी करार

जळगाव : जळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासंदर्भात जेट सर्व्ह एव्हिएशन प्रा.लि. आणि जळगाव विमानतळाचे संचालक यांच्यात करार करण्यात आला. यावेळी कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस.आर. ओला यांनी करारावर सह्या केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते.

यावेळी एस.आर. ओला आणि विमानतळ संचालकांमध्ये करार करण्यात आला आहे. त्यानुसार वर्षभरात ही कंपनी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. या वैमानिक प्रशिक्षण केंद्रासाठी ओला आणि त्यांच्या टीमने संपूर्ण विमानतळाची पाहणी केली. तसेच केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्तावित जागेचे निरीक्षण केले. कंपनीला लवकरात लवकर काम कसे सुरू करता येईल, यावरही त्यांनी चर्चा केली.

यावेळी विमानतळ सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते. त्यांनी कंपनीचे अधिकारी आणि विमानतळ संचालक यांना याबाबत सूचनादेखील केल्या. या करारानुसार केंद्र सुरू करण्यासाठी या कंपनीला एक वर्षाची मुदत आहे. त्यात मूलभूत सुविधा या विमानतळ प्राधिकरणाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Web Title: Agreement to establish a pilot training center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.