आमदार निलंबनाच्या निषेधार्थ भाजपतर्फे आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:47+5:302021-07-07T04:21:47+5:30
भुसावळ : राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका विधिमंडळ अधिवेशनात सदनासमोर सादर करण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या १२ लढवय्या आमदारांना ...

आमदार निलंबनाच्या निषेधार्थ भाजपतर्फे आंदोलने
भुसावळ : राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका विधिमंडळ अधिवेशनात सदनासमोर सादर करण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या १२ लढवय्या आमदारांना बोलण्याची संधी न देता तालिका अध्यक्षांनी लोकशाहीची गळचेपी व हत्या करत १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केल्याच्या व राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षणासंदर्भात असलेल्या विरोधी भूमिकेचा निषेध करत भुसावळ, वरणगाव, रावेर, यावल, बोदवड येेथे मंगळवारी भाजपतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. ठिकठिकाणी पक्षाने प्रशासनाला निवेदने दिली.
बोदवड येथे दिले निवेदन
बोदवड : भाजप आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात येथे भाजपतर्फे आंदोलन करून नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष अनिल खंडेलवाल, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र डापसे, भाजप चित्रपट कामगार आघाडी तालुकाध्यक्ष उमेश गुरव, भाजप शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, भाजयुमो तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, सचिन जैस्वाल, पंकज चांदुरकर, नाडगाव गणप्रमुख सुधीर पाटील, सुदर्शन खराटे, जीवन माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.