शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

आषाढी एकादशीनिमित्त दुपारी रथोत्सव उत्साहात पार

By admin | Updated: July 15, 2016 18:14 IST

विठ्ठल मंदिर संस्थान व वाणी पंच मंडळाच्यावतीने प्रतिपंढरपूर पिंप्राळा येथे शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त दुपारी रथोत्सव उत्साहात पार पडला.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 15 - विठ्ठल मंदिर संस्थान व वाणी पंच मंडळाच्यावतीने प्रतिपंढरपूर पिंप्राळा येथे शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त दुपारी रथोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी प्रिंप्राळानगरी विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमली होती. रथोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. रथाचे यंदाचे १४१ वे वर्ष होते. राकेश उमाकांत वाणी यांच्या हस्ते अभिषेक होऊन पांडुरंग स्वरुप श्री बाळकृष्णाची मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, साधना महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे, उपमहापौर ललित कोल्हे, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक दादा नेवे, माजी महापौर विष्णू भंगाळे, पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले, भाजपाचे गटनेते डॉ. अश्विन सोनवणे, पोलीस पाटील, प्रभाकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक शिंदे आदी मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या घोषात रथाला सुरुवात झाली. जुनी चावडी, कुंभारवाडा, कोळीवाडा, मढी चौक, धनगर वाडा, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, केशरीनंदन हनुमान चौक यामार्गे रथ पुन्हा जुनी चावडी येथे पोहचला. रथावर दोन घोडे, सारथी म्हणून अर्जुन, हनुमान यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या तर रथाच्या पुढे भजनी मंडळे व लेझीम पथके होती. मोगरीवाले त्र्यंबक पाटील, पुरुषोत्तम सोमाणी, चिंधा बारी, माधव महाजन, जीवन पाटील, शिवाजी कुंभार, सोनू कोळी यांच्यासह इतर भाविक तसेच भजनी मंडळ सदस्यांचा गंध लावून व नारळ उपरणे देऊन सत्कार झाला.