शेजारणीच्या आत्महत्येनंतर ग्रा.पं. सदस्याच्या पत्नीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:11+5:302021-02-05T05:56:11+5:30
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या इमाम युनुस पिंजारी यांच्या पत्नी शबनमबी पिंजारी ...

शेजारणीच्या आत्महत्येनंतर ग्रा.पं. सदस्याच्या पत्नीची आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या इमाम युनुस पिंजारी यांच्या पत्नी शबनमबी पिंजारी (वय २५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी पिंजारी यांच्या शेजारच्या याच वयाच्या महिलेने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. यामुळे भूतबाधा झाल्याच्या अंधश्रद्धेचे पेव फुटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमाम युनुस पिंजारी हे बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करतात. मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते विजयी झाले. पत्नी शबनमबी गृहिणी होती. मंगळवारी इमाम पिंजारी हे जळगाव शहरात कामाला आले होते. तीन मुलांसह शबनमबी पिंजारी या घरी होत्या. सकाळी ११ वाजता घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पतीने तातडीने घरी धाव घेतली. नातेवाइकांनी शबनमबी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद येथील माहेरच्या लोकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शबनमबीचा मृतदेह पाहून प्रचंड आक्रोश केला. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.