शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा ; एकाविरूध्द गुन्हा

By सागर दुबे | Updated: March 2, 2023 20:31 IST

डीवायएसपींच्या पथकाची कारवाई ; १ लाख ६८ हजारांच्या बनावट नोटा जप्त

जळगाव : हमाली काम करता-करता युट्यबवरील व्हिडिओ पाहून प्रिंटरच्या माध्यमातून घरामध्ये चक्क बनावट नोटा तयार करणाऱ्या कुसूंबा येथील देविदास पुंडलिक आढाव (३१)  या तरूणाचा उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. त्याच्याकडून १ लाख ६८ हजार ९०० रूपयांच्या बनावट नोटा तसेच प्रिंटर, नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सद्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नकली नोटा चलनात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी बनावट नोटा बनविणा-या काही लोकांना पकडले होते. त्यानंतर बुधवारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांना माहिती मिळाली की, एमआयडीसीतील व्ही सेक्टर भागात कुसूंबा येथील देविदास आढाव हा तरूण बनावट नोटा तयार करून त्या नोटा बाजारात विक्री करण्यासाठी वापर करत आहे. गावीत यांनी लागलीच पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, राहुल बैसाने, महेश महाले, रवींद्र मोतीराया, नीलेश पाटील, सुहास पाटील, रेवानंद साळूंखे, चंद्रकांत पाटील, विजय जाधव यांचे विशेष पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या.पंटर पाठवून केली खात्री, ओक्के मिळताच रचला सापळा...आढाव याला जाळ्यात अडकविण्यासाठी पोलिसांनी प्लॅन आखला. त्यांनी खासगी पंटरला आढाव याच्याकडे पाठवून बनावट नोटा कमी दरामध्ये देण्यास सांगितले. त्यामुळे आढाव व पंटरमध्ये बनावट देण्याचा हिशोब ठरला आणि भेटण्याचे स्थळही ठरले. दरम्यान, आढाव हा बनावट नोटा देत असल्याची खात्री झाल्यावर ही माहिती पंटरने पथकाला दिल्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर आढाव हा एमएच.१९.डीयू.१२०३ क्रमांकाच्या दुचाकीवरून आला. त्याने पंटरच्या हातात बनावट नोटांची पिशवी देवून ख-या नोटा घेतल्या. पोलिसांनी लागलीच आढावा याला पकडून चौकशी केली.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी