शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मृत्यूनंतरही आठवणी रुपी जगा, जळगावात आजीच्या उत्तरकार्यावेळी नातवाने केली देहदानाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:46 IST

अनोखा संदेश

ठळक मुद्देदिग्गजांनी देहदान करून निर्माण केला आदर्शदेहदान चळवळींना पाठिंबा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - देहदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपण सर्वांनी हे दान केल्यास आपल्यानंतरही दुसऱ्याला त्यातून जीवदान मिळू शकते व मृत्यूनंतरही आपल्या आठवणी समाजात राहू शकतात, असा संदेश देण्यात आला तो उत्तरकार्याच्या मंडपातून. निमित्त होते एका विशीतील तरुणाने आयोजित केलेल्या ‘देहदान : समज आणि गैरसमज’या विषयाच्या मार्गदर्शनाचे.अजित अमरनाथ ठाकूर या युवकाच्या ९८ वर्षे वयाच्या आजी कलावती मदनलाल ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या उत्तरक्रियेच्या निमित्ताने ‘देहदान: समज आणि गैरसमज’ या विषयावर जनजागृती करावी या उद्देशाने त्याने आई-वडील आणि काका-काकू यांच्या प्रेरणेने या आगळ््या-वेगळ््या उपक्रमाचे खोटेनगर येथे आयोजन करण्यात आले होते.उत्तरक्रियेचे विधी सुरू होण्यापूर्वीच सकाळी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केलेल्या गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचना शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ . प्रफुल्ल दकणे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सुमारे दोनशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. देहाचे दहन करण्याऐवजी वैद्यकीय महाविद्यालाय दान केल्यास वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोग होतो. कोणतीही व्यक्ति कोणत्याही वयात एक साधा अर्ज भरून देहदानाचे  ईच्छापत्र जवळच्या वैद्यकीय महाविद्यालाकडे देऊ शकते. अर्ज भरलेला नसला तरी नातेवाईकांनी या पवित्र दानाची इच्छा व्यक्त केल्यास मरणोत्तर दान करता येतेच, असेही डॉ . दकणे यांनी सांगितले.दिग्गजांनी देहदान करून निर्माण केला आदर्शपश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानाजी देशमुख, उद्योगपती शंतनू किर्लोस्कर, कवी  विंदा करंदीकर अशा विविध क्षेत्रातील असंख्य महनीय व्यक्तींनी देहदान करीत समाजासमोर आदर्श ठेवण्याकडेही डॉ . दकणे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.पुणे येथील शलाका आणि त्यांचे पती पत्रकार डॉ. प्रा. किरण ठाकूर यांनी रक्तदान, नेत्रदान, आणि देहदान या चळवळींना गेल्या २० वर्षांपासून पाठिंबा दिला आहे. या दोघांचे यावेळी कौतुक करण्यात आले.या उपक्रमाला रमेश चव्हाण, सुरेशचंद्र चव्हाण, अशोक ठाकूर, दिनानाथ ठाकूर, राघवेंद्र ठाकूर, द्वारकानाथ ठाकूर, अमरनाथ ठाकूर यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला पाठिंबा दिला. यावेळी चव्हाण -ठाकूर परिवारातील महिलाही या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :JalgaonजळगावHealthआरोग्य