चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस स्थानकात घुसली
By Admin | Updated: July 10, 2017 17:54 IST2017-07-10T17:54:41+5:302017-07-10T17:54:41+5:30
ब:हाणपूर-जामनेर बसमधील सहा प्रवाशी जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस स्थानकात घुसली
>ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.10- चालकाचे एस.टी. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस स्थानकावरील प्लॅटफॉर्म मध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात 6 प्रवाशी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर बसथनाकात घडली.
जामनेर आगाराची ब:हाणपूर - जामनेर ही बस मुक्ताईनगर बसस्थानकात आली. चालक एम.आर.नेटके हे बस प्लॅटफॉर्म वर उभी करीत आतांना त्याचे बसवरील अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे बस स्थानकातील प्लॅटफॉर्म च्या भिंतीवर आदळली. या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ सुरु झाला. बसमधील 6 प्रवाशांना जबर मार लागलेला आहे. जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघातात र}ाबाई ज्ञानेश्वर पाटील रा.मोहोद (मध्यप्रदेश), पंढरीनाथ सुकदेव टपरा, रा.पळासखेडा,ता.जामनेर, अंजना भागवत बेलदार, रा.मोहोद (मध्यप्रदेश), रुख्माबाई अशोक सुर्यवंशी, रा. मोहोद (मध्यप्रदेश), रुख्मिणीबाई ठाणसिंग राजपूत, रा. मोहोद (मध्यप्रदेश), पुंडलिक कडू पाटील (रा.धाबेपिप्री,ता.मुक्ताईनगर) हे जखमी झालेले आहेत.